CHHATRAPATI SAMBHAJINAGAR CRIME: Man Brutally Killed in Front of Kids

CHHATRPATI SAMBHAJINAGAR CRIME: चिमुकल्यांसमोरच वडलांची बोटं छाटली, वार केले अन्…

49 0

CHHATRPATI SAMBHAJINAGAR CRIME: छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणारी एक थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. रेल्वे स्टेशनलगतच्या (CHHATRPATI SAMBHAJINAGAR CRIME) सिल्क मिल कॉलनी परिसरात सैय्यद इमरान शफीक नावाच्या व्यक्तीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हा हल्ला शफीक यांच्या तीन आणि तेरा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलांसमोर करण्यात आला.

ELECTRIC BOND MAHARASHTA : महाराष्ट्रात कागदी बॉंड्सची झंझट संपुष्टात! ई-बॉंड प्रणालीचे युग सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, सैय्यद इमरान शफीक हे त्यांच्या दोन मुलांसोबत एका रिक्षातून प्रवास करत होते. सिल्क मिल कॉलनी भागात अचानक एक भरधाव कार त्यांच्या रिक्षाच्या (CHHATRPATI SAMBHAJINAGAR CRIME) आडवी आली आणि रिक्षा थांबवण्यात आली. कारमधून उतरलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी शफीक आणि त्यांच्या मुलांना रिक्षातून ओढून बाहेर काढले. कुणालाही काही कळायच्या आत आरोपींनी शफीकवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. शफीक यांनी स्वतःला वाचवण्याचा आणि हल्लेखोरांच्या हातातील चाकू ओढण्याचा प्रयत्न केला. याच झटापटीत आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत त्यांची बोटं छाटली. यानंतरही न थांबता मारेकऱ्यांनी शफीक यांच्या उजव्या हातावर आणि मानेवर अनेक तीक्ष्ण वार केले आणि त्यांचा जागीच खून केला.

Propertyscam: लाखांत फ्लॅट? दहा लाखांत घर?,आकर्षक ऑफर्समागे मोठा सापळा!

या भयानक हल्ल्यानंतर हल्लेखोर शफीक यांचा मृतदेह ओव्हरब्रिजखाली टाकून पसार झाले. अतिरक्तस्त्रावामुळे शफीक यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा (CHHATRPATI SAMBHAJINAGAR CRIME) रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून दोन्ही अल्पवयीन मुलं गोंधळलेली, भयभीत आणि मानसिक धक्क्यात होती. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचं वातावरण आहे.
हत्येमागे ‘गॅस व्यवसायातील वैमनस्य’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैय्यद इमरान शफीक यांची हत्या गॅस व्यवसायातील जुन्या वैमनस्यातून झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. व्यवसायातील शत्रुत्व हेच या क्रूर हत्येमागचं प्रमुख कारण असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा सराईत गुंड असून, त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासाची चक्रं वेगाने फिरवत पोलिसांनी केवळ नऊ तासांच्या आत या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा कसून शोध पोलीस घेत आहेत. या निर्घृण घटनेमुळे शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे चित्र असून, या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Share This News
error: Content is protected !!