CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR NEWS:

CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR NEWS:जमिनीच्या वादातून छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाला संपवलं

80 0

CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR NEWS: एका भयंकर घटनेने छत्रपती संभाजी नगर (CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR NEWS)  हादरलं
“आज कुणालाच जिवंत सोडायचं नाही” अशा आरोळ्या देत निमोने कुटुंबानं पाडसवान कुटुंबावर थेट घरासमोरच हल्ला केला.

VIDEO NEWS: जमिनीच्या वादातून छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाला संपवलं

या हल्ल्यात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असून त्यांचे वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाला.

हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

शुक्रवारी दुपारी १ वाजता एन-६ संभाजी कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली.

किराणा व्यापारी प्रमोद रमेश पाडसवान यांनी दोन वर्षांपूर्वी सिडकोची अतिरिक्त (ऑडशेप) जमीन रीतसर विकत घेतली होती.

मात्र, या जमिनीवरून गेल्या दोन वर्षांपासून निमोने कुटुंबाशी वाद सुरू होता. गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान वाद पुन्हा पेटला.

HINJEWADI IT PARK CRIME: हिंजवडी आयटी पार्क हादरलं! 82 कोटींचा डेटा घोटाळा! माजी कर्मचाऱ्यांकडूनच कंपनीला गंडा

पाडसवान यांनी अर्धा प्लॉट देण्याची तयारी दाखवली तरी निमोने कुटुंब संपूर्ण प्लॉट रिकामा करण्याच्या हट्टावर ठाम राहिले.

त्यानंतर निमोने कुटुंबाने शुक्रवारी दुपारी १ वाजता एन-६ संभाजी कॉलनीत पाडसवान यांच्या कुटुंबावर भ्याड हल्ला केला.

हल्ल्यादरम्यान सौरभ, ज्ञानेश्वर, गौरव या तिघा भावांनी वडील काशीनाथ, आई शशिकला आणि जावई मनोज दानवे यांच्यासह थेट प्राणघातक हल्ला केला.

निमोने कुटुंबाने थेट चाकू आणि रॉडने हल्ला चढवत पाडसवान कुटुंबावर सपासप वार केले. यात प्रमोद रक्तबंबाळ अवस्थेत घरासमोर पडले.

तर त्याचा मुलगा आणि वडिलांना देखील बेदम मारहाण केल्याचे दिसून येते. प्रमोद पाडसवान यांच्या पाठीवर आणि पोटावर खोलवर वार झाले.

MUMBAI KANDIWALI CYBER NEWS: मुंबई पोलिसांकडून सायबर रॅकेटचा पर्दाफाश;देशभरात केली 60 कोटींची फसवणूक

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा रुद्रांश वय 17 वर्ष, आणि त्याचे वडील रमेश पाडसवान वय 60 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत.

निमोने कुटुंबाविरोधात गेल्या दोन वर्षांत सातपेक्षा अधिक तक्रारी असूनही पोलिस व सिडकोने कोणतीच ठोस कारवाई केली नाही.

त्यामुळेच त्यांच्या गुंडगिरीला खतपाणी मिळाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

NIGADI MASK MAN NEWS: हातात चाकू, तोंडावर मास्क अन् भर दिवसा रस्त्यावर दहशत; पिंपरी-चिंचवडमधील ‘मास्क मॅन’ पोलिसांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण?

Share This News
error: Content is protected !!