Charminar Express

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

611 0

हैदराबाद : वृत्तसंस्था – रेल्वे अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. एक्स्प्रेस गाडीचे (Charminar Express) तीन कोच रुळावरुन उतरले. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाल्याचे समजत आहे. हे डबे नेमके रुळावरुन कसे घसरले याबद्दल अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

काय घडले नेमके?
तेलंगणा इथल्या नामपल्ली रेल्वे स्थानकावर चारमीनार एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली. ही घटना सकाळी 9.15 च्या सुमारास घडली. हे शेवटचं स्टेशन असल्यानं ट्रेन इथे थांबणं अपेक्षित होतं मात्र त्यापूर्वीच या एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले.

या दुर्घटनेत ट्रेनच्या दाराजवळ उभ्या असलेल्या 5 जणांना दुखापत झाली. त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रेनचे रुळावरुन घसरलेले डबे पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे सीपीआरओ राकेश यांच्याकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!