Chandrapur News

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

597 0

चंद्रपूर : चंद्रपुरातून (Chandrapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका आईने आपल्या मुलीला विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपुरात 13 वर्षीय मुलीला आईनेच विहिरीत ढकललं. यानंतर आईने स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. तर 10 वर्षीय मुलाने पळ काढल्याने सुदैवाने मुलगा वाचला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ही धक्कादायक घटना सावली तालुक्यातील खेडी येथे घडली आहे. दर्शना दीपक पेटकर (वय 35) आणि समीक्षा दीपक पेटकर (मुलगी, वय13) अशी मृतांची नावं आहेत. आईने मुलीला विहिरीत ढकलून स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. बुधवारी दुपारी दर्शना यांनी दोन्ही मुलांसह खेडी येथील आपलं शेत गाठलं. त्यांनी आधी आपल्या मुलीला विहिरीत ढकललं. तर हे दृश्य पाहून मुलाने तिथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. त्यानंतर दर्शना यांनी स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

मुलाने पळत जात घडलेला प्रकार गावात सांगितला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दर्शना यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!