Car Accident

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

833 0

रामगढ : वृत्तसंस्था – लग्न सोहळा पार पडल्यानंतर आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नवदाम्पत्याचा कार अपघातात (Car Accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात नवदाम्पत्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या कारला ट्रकने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. कारमधील सर्वांना रामगढच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. लग्न सोहळा आटोपून सर्वजण बलौदाला परत येत असताना हा अपघात झाला होता. या अपघातानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

लग्नसोहळ्यामुळे आनंदी असलेलं वातावरण अपघातानंतर आक्रोशात बदललं. वधुवरांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभम सोनी आणि नेहा सोनी असे नवदाम्पत्याचे नाव आहे. पहाटे पाचच्या सुमारास पकरिया जंगल इथं चंडी देवी मंदिराजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!