पोत्यात, बेड खाली, देवघरात नोटांचे बंडल; लाचखोर बायकोचा पतीने केला पर्दाफाश, पाहा VIDEO

482 0

नगरपालिकेत अधिकारी असलेली आपली पत्नी ही लाचखोर असल्याचा आरोप करत पत्नीने घरभर जमलेल्या पैशांचे बंडल दाखवत पतीने बनवलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून लाचखोर पत्नीचा पतीने पर्दाफाश केला. ही घटना हैदराबाद मध्ये घडली आहे.

हैदराबादमधील मणिकोंडा नगरपालिकेत डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर पदावर असलेल्या महिला अधिकारी दीव्यज्योती यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी अनेकांकडून लाज घेतली असून हा सर्व पैसा त्यांनी आपल्या घरामधील वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला असल्याचा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. हेच पैसे दाखवतानाचा व्हिडिओ त्यांच्यात पतीने म्हणजेच श्रीपाद यांनी रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

श्रीपादने पुरावा म्हणून हा व्हिडिओ तयार केला असून या व्हिडिओत पत्नी दररोज लाखो रुपयांची लाच घेऊन घरी येते असं सांगितलं. या व्हिडिओत तो घराच्या कपाटापासून, ते देवघरांमध्ये ठेवलेल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील नोटांचे बंडल दाखवत आहे. पण त्याने आपल्या पत्नीच्या विरोधात असा व्हिडिओ का बनवला हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

याबाबत देखील त्याने स्पष्टीकरण दिले. गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी दिव्य ज्योती ही त्याच्याशी भांडण करते. जेव्हा श्रीपाद तिला तिच्या कामाबद्दल विचारतो तेव्हा ती त्याचा अपमान करते. वारंवार होत असलेल्या वादांमुळे त्याने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळेच पुरावे म्हणून त्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून सोशल मीडियावर तो आता व्हायरल होत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!