Buldhana News

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

559 0

बुलढाणा : बुलढाण्यामधून (Buldhana News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका पोलिसाने ऑटो चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण केली आहे. प्रतिबंधक कारवाईच्या नावाखाली एका व्यक्तीस पोलिसाने मारहाण केली. पोलिसाचा हा क्रूर चेहरा पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अखेर या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

मारहाण झालेली व्यक्ती ही ऑटो चालक असल्याची माहिती पुढे आली आहे. तर नंदकिशोर तिवारी असे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या नंदकिशोर तिवारीला निलंबित करण्यात आले आहे. 1 मार्च रोजी हा सगळा प्रकार घडला आहे.

बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याने ऑटो रिक्षा का घेत नाही, म्हणून दोन युवकांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर प्रवाशाने ऑटो चालकाची पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ऑटोचालक आणि प्रवाशाला पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी ऑटोचालकाला बीट जमादार नंदन किशोर तिवारी याने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!