BULDHANA CASE: ताटात उष्टे अन्न ठेवले, या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची
धक्कादायक घटना बुलढाण्यात (BULDHANA CASE) घडली.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात 13 ऑगस्ट रोजी धक्कादायक प्रकार घडला.
DAUND CRIME CASE :पंढरपूरला निघालेल्या तरूणीवर दौंड जवळ अतिप्रसंग
वडील रामराव तेल्हारकर वय 69 वर्ष आणि मुलगा शिवाजी वय 40 वर्ष यांच्यात नेहमीच वाद व्हायचे..
काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस” म्हणून वडील रामराव आणि मुलगा शिवाजी यांच्यात या कारणावरून वाद पेटला.
त्यात ताटात उष्टे अन्न ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद आणखी चिघळला…
या वादाचे रूपांतर क्रूर हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुऱ्हाडीचा वार करत त्यांचा खून केला..
वडील रामराव तेलारकर यांचा मुलगा शिवाजीला हत्या लपवण्यासाठी
शिवाजी व त्याचा मुलगा कृष्णा वय 17 वर्ष या दोघांनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरला.
आणि दुचाकीवर तालुक्यातील खिरोडा पुलाजवळ नेला आणि पूर्णा नदीत फेकून दिला.
या घटनेची माहिती अनेक दिवस गुप्त ठेवण्याचा प्रयत्नही झाला..
WARDHA DEVALI NEWS: वर्धातील देवळीत संतापजनक घटना!75 वर्षीय वृद्धेवर 28 वर्षीय नराधमाचा अत्याचार
एक घटनेनंतर रामराव तेलारकर यांची सून योगिता शिवाजी यांनी तामगाव पोलीस ठाण्यात
दिनांक 19 ऑगस्टला तक्रार दाखल केली..
त्यानंतर फॉरेन्सिक टीमला तात्काळ बोलावून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
WARDHA DEVALI NEWS: वर्धातील देवळीत संतापजनक घटना!75 वर्षीय वृद्धेवर 28 वर्षीय नराधमाचा अत्याचार
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी शिवाजी याला 20 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतलं..
आणि त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
MAKRAND JADHAV PATIL: मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट;अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा
मृतकाची सून योगिता शिवाजी तेलारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिवाजी तेलारकर याला
तात्काळ ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली..
दुसरी एक विशेष बाब म्हणजे अद्यापही मृतक रामराव तेलारकर यांचा मृतदेह सापडलेला नाही.