बारामती: बारामतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून महाविद्यालयात दिवसाढवळ्या विद्यार्थ्यांचा कोयत्याने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
बारामतीतील तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या वादातून झाला खून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे
कोयत्याने वार केल्याने या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अथर्व पोळ असं मयत विद्यार्थ्यांचं नाव आहे.