पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; कोणतीही जीवितहानी नाही

534 0

पुण्यातील भवानी पेठमधील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भवानी पेठमधील विशाल सोसायटीमध्ये एक किरकोळ ब्लास्ट झाला आहे. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसून पुणे पोलीस याचा तपास करत आहे.

या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भवानी पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला आहे. हा स्फोट नेमका कशाचा आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता एवढी होती की संबंधित व्यक्तीच्या घराच्या काचा फुटल्या आणि पूर्ण बिल्डिंगमध्ये स्फोटाचा धक्का जाणवला. मात्र स्फोट घडल्याने पोलिसांकडून एका व्यक्तीची कसून चौकशी करत होते. या प्रकरणी पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या राशीद शेख नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

Share This News
error: Content is protected !!