बीड जिल्ह्यातील खुणाचे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. माजलगाव शहरात भाजप संपर्क कार्यालयाच्या बाहेरच एका तरुणाची धारदार कोयत्याने हत्या करण्यात आली. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बाबासाहेब आगे हे भाजप लोकसभा विस्तारक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. घटना घडल्यानंतर पोलीस संघटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी आरोपी नारायण फपाळ हा स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आरोपी नारायण पफाळ हा ऊसतोड मजूर आहे. तो बेलुरा या गावचा रहिवासी आहे. मात्र कीट्टी आडगाव येथील तो जावई असल्याचे समोर आले आहे. तर मयत बाबासाहेब आगे हे कीट्टी आडगाव गावचे रहिवासी आहेत.