बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट; पुण्याच्या कर्वेनगरमधील आणखी एका आरोपीला अटक

368 0

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट पुण्यातून समोर आली आहे. सिद्दिकी हत्याकांड प्रकरणात पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये त्यानेही शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे.

गौरव विलास आपुणे (वय-23, रा. कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा देखील या हप्त्याच्या कटात सहभाग असल्याचं तपासातून निष्पन्न होताच कारवाई केली आहे.

पुण्यातील कर्वेनगर परिसरातून सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या प्रवीण लोणकर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर आता याच परिसरात राहणाऱ्या गौरव याला देखील अटक करण्यात आली आहे. तो एका खासगी कंपनीत काम करतो. गौरवला सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाची संपूर्ण माहिती होती. त्याचबरोबर या प्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार गौतम आणि हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट करणारा शुभम लोणकर यांनी त्याला शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण दिल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.

इतर आरोपींच्या संपर्कात

गौरव हा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी रुपेश मोहोळ, शिवम कोहाड, करण साळवे आणि प्रवीण लोणकर यांच्या संपर्कात होता. पूर्वनियोजित कट रचत असताना देखील तो उपस्थित होता. सुरुवातीला सिद्दीकी यांच्या हत्येचं कंत्राट नितीन सप्रे आणि राम कनोजिया यांना देण्यात आलं होतं. त्यावेळी गौरवला शूटर म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यादरम्यान त्याला इतर आरोपींकडून पिस्तूल चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आल्याचं, तपासातून समोर आलं आहे. त्यामुळेच पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!