मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी मॉर्निंग वॉक करताना क्रिकेट बॅट आणि स्टंपसह सशस्त्र मुखवटाधारी व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून आता या हल्ला प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली असून या हल्ल्याचा सूत्रधार मकोकातील आरोपी असून, तो ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे. संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागील सूत्रधार आशोक खरात हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध तब्बल १३ गुन्हे नोंद आहेत. गवळी गँग मधील एकाची हत्या केल्याच्या गुन्ह्यात देखील खरात आरोपी आहे. खरात विरोधात MCOCA अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे. भांडुप परिसरात खरात राजकारणात सक्रिय असून दोन वेळा लोक जनशक्ती नावाच्या पार्टीकडून पलिकेलची निवडणूक त्याने लढवली आहे.