BHANDARA ACCIDENT NEWS: भंडारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक भीषण अपघाताची घटना आज लाखनी-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. सिंगोरी गावाजवळ वाळूने भरलेल्या एका (BHANDARA ACCIDENT NEWS) भरधाव टिप्परखाली दुचाकीस्वार राजू भोयर हे चिरडले गेले असून, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हा अपघात आज सकाळी सिंगोरी गावाजवळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वाळूने भरलेला हा भरधाव टिप्पर चुकीच्या लेनने आणि अत्यंत वेगात साकोलीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या (BHANDARA ACCIDENT NEWS) राजू भोयर यांच्या दुचाकीला टिप्परने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार राजू भोयर हे टिप्परखाली आले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. धडकेनंतर टिप्परही रस्त्यावर उलटला.
HINDU ECONOMIC FORUM:पुण्यात हिंदू इकॉनॉमिक फोरमतर्फे अर्थकारण आणि उद्योजकता या विषयावर परिषद संपन्न
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. त्यांनी तातडीने कारधा पोलिसांना घटनेची माहिती दिली. कारधा पोलिस ठाण्याचे अधिकारी व पथक (BHANDARA ACCIDENT NEWS) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने टिप्परखाली अडकलेला मृतदेह मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, ती पोलिसांनी सुरळीत केली.
या भीषण अपघातानंतर टिप्पर चालक तातडीने घटनास्थळावरून पळून गेला. कारधा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार चालकाचा कसून शोध सुरू आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात आणि बेदरकार ड्रायव्हिंग यामुळे महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. राजू भोयर यांच्या अकाली निधनामुळे सिंगोरी परिसरात आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत आणि चालकाला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.