BEED NEWS : बीडमध्ये सावकारीने घेतला आणखी एकाचा बळी…!

102 0

BEED NEWS :  बीड जिल्ह्यात सावकारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याची बाब समोर आली आहे. एवढंच नाही तर सावकारी जाचाला कंटाळून एका कापड व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून समोर येणारी प्रकरण पाहता बीड म्हणजे गुन्हेगारी जगताचं केंद्रस्थान बनले आहे की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागलीये..! सावकारी जाचाला कंटाळून सुसाईड नोट लिहीत (BEED NEWS) एका कापड व्यावसायिकानं गळफास घेतलाय चला जाणून घेऊयात काय आहे नेमकं हे प्रकरण ?

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत घडलेली ही घटना… ज्या ठिकाणी वास्तव्याला असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये दहा टक्क्याने व्याजानं उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिना अशी करण्यात आली मात्र पैसे देऊनही सावकारी जाच काही कमी होत नव्हता. “तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड “! असं म्हणत सावकारांना राम फाटाले यांचा मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी राम फटाले यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्यानंतर आत्महत्या केली. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी तिघे सांग अटकेत आहेत. विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर लक्ष्मण जाधव हा भाजपचा पदाधिकारी आहे. जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एकाने सावकारीच्या जाचातून आत्महत्येचे पाऊल उचललंय…

Pratap Sarnaik letter: ठाकरे बंधूंवर टीका करत प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र;पत्रात काय ?

आत्महत्येपूर्वी राम फाटले ज्यांनी एक भावनिक पत्र लिहिलय हे पत्र वाचल्यानंतर कोणाच्याही डोळ्यातून सहजपणे पाणी येईल

प्रिय आई आणि पप्पा
सुजय, गौरी आणि रेणुका

मी चांगला मुलगा, पती आणि वडील होऊ शकत नाही तरी मला माफ करा. रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील सुजय आणि गौरी यांची काळजी घ्यावी लागेल. श्याम भाऊ लखन, माझी मुले आणि बायको आई वडील यांना सांभाळा. मला माफ करा तुम्हा सर्वांचा राम.
माझे आई-वडील यांच्याकडे माझ्या मातीसाठी पैसे नाहीत. माझी माती समाजाकडून वर्गणी काढून करावी. माझा 10 व 13 आणि 14 व करू नका. माझं वर्ष श्राद्ध करू नका ही माझी इच्छा आहे. रेणुका मी तुझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी देऊन जात आहे तुला यापुढे खंबीरपणे सर्वांशी झगडावं लागेल.
तुझा राम
मी आत्महत्या करण्यास कारणीभूत असलेली व्यक्ती डॉ. लक्ष्मण जाधव त्यांची पत्नी वर्षा जाधव आहेत त्यांनी मला मानसिक त्रास दिला व माझा छळ केला मी त्यांच्याकडून व्याजाने उसने पैसे घेतले होते मी त्यांना रक्कम परत केली होती पण माझे चेक बोर्ड परत दे म्हणालो अजून रक्कम दे माझे बँक खाते पत्नी आणि मुलीचे बँक खाते बँक ऑफ बडोदा मध्ये आहे. साहेब त्यांच्याकडून सर्व रक्कम परत घेऊन माझ्या परिवाराला परत द्यावी. ही नम्र विनंती. गेल्या सहा-सात वर्षांपासून मी त्यांना रक्कम देत आहे. तरी माझे बँक खाते तपासून रक्कम परत देण्यात यावी ही आपणास विनंती.
अशा आशयाचा पत्र राम फटाले यांनी लिहिले आहे. राम फटाले यांच्या आत्महत्येपूर्वीचं पत्र मन हेलावून टाकणारं आहे. एवढंच नाही तर “आई-वडिलांसाठी माती करायला वर्गणी काढा”, हे शब्द म्हणजे समाजव्यवस्थेवरचा एक मोठा सवाल आहे.

TOP NEWS MARATHI :मराठी माणसांविरोधात वक्तव्य सहन करणार नाही,योगेश कदम यांचा इशारा

आज ज्या सावकाराने राम फटाले यांचा छळ केला, तो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे ही आणखी एक धक्कादायक गोष्ट…सवाल एवढाचय सावकार बदलत नाहीत, की व्यवस्था झोपलेली आहे? बीडमध्ये सावकारी बळी घेत आहे, आणि हा आकडा फक्त एक नसून, वाढतच जातोय. हे सगळं थांबायला हवं…कदाचित आता एक राम फटाले गेले… पण जर वेळेत पावलं उचलली नाहीत, तर उद्या अजून कोण तरी असेल..?

Share This News
error: Content is protected !!