Beed Gevrai news: बीड जिल्ह्यात वीज कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील रोहीतळ गावात रविवारी दुपारी ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिला विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. ( Beed Gevrai news) त्यापैकी एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसरी महिला बेशुद्ध पडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास रोहीतळ परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्या वेळी गावातील काही महिला शेतात कापूस वेचणीचे काम करत होत्या. पाऊस वाढल्याने या महिला जवळच्या झाडाखाली आसरा घेण्यासाठी गेल्या. परंतु अचानक वीज कोसळल्याने त्या दोघींच्या अंगावर विजेचा जोरदार शॉक बसला.
विमानात मराठी बोलणाऱ्या महिलेशी वाद; AVINASH JADHAV, युट्युबर MAHI KHAN विरोधात आक्रमक
या घटनेत रुक्मिणी शिंदे (वय ५५) आणि विमल गायकवाड (वय ५२) या दोन्ही महिला जखमी झाल्या. विजेचा तीव्र झटका बसल्याने रुक्मिणी शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून विमल गायकवाड या बेशुद्ध पडल्या. ( Beed Gevrai news) घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन दोन्ही महिलांना गेवराई शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने पंचनामा करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला आहे. या संपूर्ण घटनेची माहिती नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ( Beed Gevrai news) या परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजांसह अधूनमधून पाऊस पडत आहे. नागरिकांनी अशा काळात सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा आणि झाडाखाली उभे राहणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतकऱ्यांनी हवामानातील बदल पाहून कामकाजाचे नियोजन करावे अशी विनंती करण्यात येत आहे.