BANER LODGE SEX RACKET CASE: लॉजवर तरुणीची शारीरिक संबंध ठेवून परत जाताना पुरुषांना गाठून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत हजारो रुपये उकळणाऱ्या टोळीचा पुण्यात (BANER LODGE SEX RACKET CASE) पर्दाफाश करण्यात आला आहे.

BANER LODGE SEX RACKET CASE: शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडायचे अन् लॉजमधून जाताना लुटायचे; पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

134 0

BANER LODGE SEX RACKET CASE: लॉजवर तरुणीची शारीरिक संबंध ठेवून परत जाताना पुरुषांना गाठून गुन्हा दाखल करण्याची धमकी

देत हजारो रुपये उकळणाऱ्या टोळीचा पुण्यात (BANER LODGE SEX RACKET CASE) पर्दाफाश करण्यात आला आहे.

ही टोळी बाणेर आणि आजूबाजूच्या भागात सक्रिय होती.

मात्र आता बाणेर पोलिसांनीच या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

BARSHI CRIME: अनैतिक संबंधातून महिलेच्या पती आणि प्रियकराचाही मृत्यू

थेरगाव येथील महिलेमार्फत ही टोळी चालवली जात होती.

यामध्ये पिंपरीतील दोन तरुणीला पैशांसाठी शारीरीक संबंध ठेवायला भाग पाडलं जात होतं.

ही महिला पुरुषांना हेरून त्यांना काही ठराविक लॉजवर पाठवायची. तिथे या तरुणींनाही पाठवलं जायचं.

ग्राहकाने या तरुणींबरोबर शारीरीक संबंध ठेवल्यानंतर ते लॉजमधून बाहेर पडल्यावर आरोपी ग्राहकांना गाठायचे.

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना लुबाडला जायचं.

अशाच प्रकारे त्यांनी एका ग्राहकाला 12 ऑगस्टला स्वप्ना लॉजवर पाठवलं.

तिथून बाहेर पडताना या ग्राहकाला गाठून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैसे मागितले.

परंतु, त्या ग्राहकाने पैसे द्यायला नकार दिला.

DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून

ग्राहकाने आरोपींच्या धमक्या न जुमानल्यानं आरोपींनी तरुणीला घेऊन बाणेर पोलीस ठाणं गाठलं.

पाच आरोपींनी या तरुणीला ग्राहका विरोधात फिर्याद द्यायला लावली. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेला ही गोष्ट खटकली.

त्यामुळे त्यांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिनं सर्व सत्य सांगितलं.

आरोपींनी तिला पैशांचं आमिष दाखवून देहविक्री करायला भाग पाडल्याची कबुली तरुणीने दिली.

त्यामुळे पोलिसांनी या पाचही जणांना तातडीने अटक केली.

WHAT IS MANDAL COMMISSION: शरद पवारांच्या ‘मंडल यात्रे’मुळे चर्चेत आलेला मंडल आयोग नेमका काय?

नसीम सादीक उस्मानी, प्रवीण किशोर चौधरी, गुलाब सखाराम गरुड, सचिन हनुमंत जाधव

अशी या आरोपींची नावं असून यांच्यासह

थेरगावमधील एका ४० वर्षाच्या महिलेलाही अटक करण्यात आली आहे.

PCMC FIRING NEWS PUJARI GANG: पिंपरी चिंचवडच्या व्यावसायिकावर गोळीबार करणारा निघाला पुजारी गॅंगचा शूटर
ग्राहकाला भीती दाखवण्यासाठी आणि त्याच्याकडून गुन्हा मागे घेण्यासाठी

पैसे लुबाडण्याच्या विचारात असलेली ही टोळी स्वतःच स्वतःच्या जाळ्यात अडकली.

ज्या तरुणीला ग्राहका विरोधात फिर्याद द्यायला आणलं तिनेच या टोळीचा कट पोलिसांना सांगितला.

त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरात ही टोळी अनेक दिवसांपासून सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे.

त्या अनुषंगाने या टोळीने या आधी किती ग्राहकांची अशा पद्धतीने लूट केली आहे ?

त्याचबरोबर किती तरुणींना पैशांचं आमिष दाखवून देहविक्री करायला भाग पाडलंय,

याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

LATUR RAKSHABANDHAN SPECIAL: अपघातानंतर पत्नीनं साथ सोडली अन् बहिण भावाच्या मदतीला धावली

Share This News
error: Content is protected !!