Badnapur Construction Workers Kit Distribution Chaos: Major Disorder in Household Kit Distribution; Workers Express Anger

Badnapur Construction Workers Kit Distribution Chaos: बदनापूरमध्ये गृह उपयोगी संच वाटपात मोठा गोंधळ; कामगारांचा संताप

102 0

Badnapur Construction Workers Kit Distribution Chaos: जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये आज (गुरुवार) बांधकाम कामगारांना गृह (Badnapur Construction Workers Kit Distribution Chaos) उपयोगी संच वाटपाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याची परिस्थिती समोर आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, संच घेण्यासाठी ५०० हून अधिक बांधकाम कामगार लाभार्थी केंद्रावर उपस्थित होते, परंतु संचच उपलब्ध नव्हते. सकाळपासून प्रतीक्षा करूनही संच न मिळाल्याने संतप्त कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Palghar Adivasi Ashram School Student Suicide: पालघरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; प्रशासनावर संशयाचं वातावरण

आजच्या तारखेला ऑनलाईन पावत्या घेऊन शेकडो लाभार्थी बदनापूर येथील वाटप केंद्रावर आले होते. हे संच घेण्यासाठी अनेक कामगार आपापले दैनंदिन काम सोडून (Badnapur Construction Workers Kit Distribution Chaos) दूरवरून आले होते. मात्र, केंद्रावर आल्यानंतर त्यांना संच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दिवसभर उन्हात आणि त्रासात प्रतीक्षा करूनही एजन्सी आणि केंद्र चालकांकडून कोणतीही स्पष्ट आणि समाधानकारक माहिती मिळाली नाही.
लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना केवळ ‘संच उपलब्ध नाहीत’ एवढेच सांगण्यात आले, पण संच कधी मिळतील किंवा पुढील कार्यवाही काय असेल, याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ ठेवण्यात आले. एका कामगाराने तर आपल्याला “तुमच्या पावत्या रद्द होतील” असा इशारा मिळाल्याचेही सांगितले, ज्यामुळे कामगारांमध्ये आणखी भीती आणि असंतोष निर्माण झाला.

ONLINE GAMING DEBT VIRAR :ऑनलाईन गेमिंगचं व्यसन ठरलं घातक कर्जातून सुटण्यासाठी 

ज्या कामगारांसाठी ही कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली, त्याच सामान्य बांधकाम कामगारांना आज प्रशासनाच्या पूर्णपणे निष्काळजीपणाचा फटका बसला. (Badnapur Construction Workers Kit Distribution Chaos) संच वाटपाचे नियोजन करण्यापूर्वी पुरेशा संचांची उपलब्धता सुनिश्चित न केल्यामुळेच हा गोंधळ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गोंधळामुळे अनेक गरीब कामगारांना त्यांच्या रोजगाराचे नुकसान सहन करूनही रिकाम्या हाताने परत जावे लागले.

ATS RAID IN KONDHWA PUNE: 2010 मध्ये ‘इंडियन मुजाहिदिन दहशतवादी संघटने’ची कंट्रोल रूम असणारी ‘अशोका म्यूज सोसायटी’ पुन्हा चर्चेत कोंढव्यात ATS कारवाई; मोठा घबाड हाती

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी स्थानिक प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. या गोंधळाची सखोल चौकशी करून दोषी एजन्सी किंवा केंद्र चालकांवर कडक कारवाई करावी, तसेच त्वरित संच उपलब्ध करून लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी उपस्थित कामगार एकमुखाने करत आहेत. या घटनेमुळे बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांच्या अंमलबजावनीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  बदनापूरमधील या गोंधळावर प्रशासकीय पातळीवर काय उपाययोजना केली जाते, याकडे आता सर्व कामगारांचे लक्ष लागलेले आहे.

Share This News
error: Content is protected !!