आयोध्यानगरी हादरली! राम मंदिरात स्वच्छता करणाऱ्या 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

176 0

देशात महिला अत्याचाराची नवनवीन प्रकरण समोर येत असताना आता रामनगरी अयोध्येतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर नऊ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही वीस वर्षांची असून बीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षणासह ती राम मंदिरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम देखील करते. तिच्यावर 16 ते 25 ऑगस्ट दरम्यान तीन वेगवेगळ्या प्रसंगात सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याविषयी तिने पोलिसात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी कॅंटचे प्रभारी निरीक्षक (एसएचओ) अमरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, ‘2 सप्टेंबरला पीडित तरुणीने तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात एफ आय आर नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. वंश, विनय, शारिक, शिवा आणि उदित अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तरुणीने ज्या नऊ आरोपींना विरोधात बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यांचा तपास घेऊन कडक शासन केले जाणार आहे.’

Share This News
error: Content is protected !!