हळदीच्या कार्यक्रमात तलवार, जांबिया घेऊन बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवाला ठोकल्या बेड्या (व्हिडिओ)

264 0

औरंगाबाद- हळदीच्या कार्यक्रमात मित्राच्या आग्रहास्तव हातात तलवारी, जंबिया घेऊन नाचणे अतिउत्साही नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. औरंगाबाद शहरात घडलेल्या या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी नवरदेवासहित सहा जणांना अटक केली.

शहरातील पुंडलिक नगर परिसरातील रेणुकानगर या ठिकाणी बिभीषण अनिल शिंदे याच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. यात बिभीषणचा मित्र व आरटीओ एजंट वसीम अय्युब शेख याने तलवार घेऊन डान्स करायला सुरुवात केली. त्यानंतर शुभम सुरेश मोरे याने दोन जांबिये बाहेर काढून बेधुंद नाचायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत बिभीषण आणि यश पाखरे, शेख बादशहा शेख बाबा, किरण गोरख रोकडे यांनीदेखील तलवार घेऊन मोबाइलमध्ये चित्रण केले. सोशल मिडियावर हा व्हिडीओ अपलोड करताच पोलिसांची त्यावर नजर पडली.

पोलिसांनी त्वरित या अतिउत्साही तरुणांचा शोध घेऊन त्यांच्याकडील हत्यारे जप्त करून त्यांना अटक केली. न्यायालयाने सर्वांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. सदरची कारवाई सहाय्यक निरीक्षक शेषराव खटाणे, दादाराव राठोड, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे, पोलीस नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे आदींनी केली.

Share This News

Related Post

महिंद्राच्या नवीन स्कॉर्पिओचा टिझर पाहिलात का ? त्या टीझरला आवाज कोणाचा आहे ओळखा पाहू !

Posted by - May 7, 2022 0
महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ म्हणजे एकदम रांगडी गाडी. ही गाडी चालवणारी व्यक्ती सुद्धा तेवढीच रांगडी पैलवान असली तर मस्तच. आता नवीन…
Accident

निशब्द ! हिंजवडीत ट्रकच्या चाकाखाली येऊन तरुणाचा तडफडून मृत्यू

Posted by - August 23, 2023 0
पुणे : पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी गाड्यांची रेलचाल असते. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो.या परिसरात आज सकाळी कामावर निघालेल्या तरुणावर…
Satara News

Satara News : संतापजनक ! मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण; साताऱ्यामधील घटना

Posted by - July 24, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये साताऱ्यात (Satara News) फलटणमधील कुरवली खुर्द या…
Arrest

कोंढव्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या नऊ जणांना अटक, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - April 10, 2023 0
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या नऊ सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून कम्प्युटर, तीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *