Crime

पुण्यातील बोपोडीत युवकाच्या हत्येचा प्रयत्न; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

6394 0

खडकी पोलिस स्टेशनच्या  हद्दीतील बोपोडीतील आदर्शनगरमधील महादेव घाट शंकर मंदिराजवळ युवकावर चौघांनी धारदार हत्यारं खुनी हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दिनेश उर्फ डीके कोठे  (रा. सर्व्हे नं. 24, बोपोडी, पुणे), अजय उर्फ कावु पिल्ले (रा. नाईक चाळ जवळ, बोपोडी, पुणे),अभिषेक उर्फ सोन्या मोरे (रा. बोपोडी गावठाण, पुणे) आणि निखिल उर्फ चंग्या गायकवाड (रा. भामटी चाळ, बोपोडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनिष राजू पडियार (21, रा. सर्व्हे नं. 26, भिमज्योत नगर, गणपती मंदिराजवळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!