ATS RAID IN KONDHWA PUNE: पुण्यातील कोंढव्यात एटीएसची छापेमारी मध्यरात्री पासून सुरू आहे. ही छापेमारी कोंढव्यातील अशोका म्यूज सोसायटीमध्ये सुरू (ATS RAID IN KONDHWA PUNE) आहे. देश विरोधी कारवाया करणारे संशयित या सोसायटीमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारेच ही छापेमारी करण्यात आली आहे. 2010 मध्ये इंडियन मुजाहिदिन दहशतवादी संघटनेची कंट्रोल रूम होती. त्यावेळी छापेमारी करून ती कंट्रोल रूम उध्वस्त करण्यात आली होती.
ह्या छापेमारीमध्ये 18 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. तर एकाच वेळी पुणे शहरातील एकूण 28 ठिकाणी अचानक छापेमारी करण्यात आली. या (ATS RAID IN KONDHWA PUNE) छापेमारीमध्ये 500 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. त्याचबरोबर एसआरपीएफ चा कडक बंदोबस्त देखील यावेळी करण्यात आला आहे. पुण्यातील कोंढवा, खडकी, वानवडी, भोसरी या परिसरांमध्ये छापेमारी करण्यात आली आहे.
ही छापेमारी ‘इसीस पुणे मॉड्युल’ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. अशी माहिती देखील समोर येत आहे. या छापेमारीमध्ये (ATS RAID IN KONDHWA PUNE) काही महत्त्वाचे कागदपत्र, लॅपटॉप, सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईवर एटीएस कडून अधिकृत माहिती येणं अजून बाकी आहे. मागील चौदा तासांपासून एटीएस आणि पोलिसांची कारवाई सुरू आहे, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या छापेमारीमध्ये कोंढव्यातील अशोका म्यूज सोसायटी बरोबरच इतर अनेक सोसायट्यांवर देखील छापेमारी करण्यात आली आहे.
MURALIDHAR MOHOL:निलेश घायवळ प्रकरणावर काय बोलणार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ?
कोंढव्यात झालेली ही छापेमारी पहिल्यांदा झालेली नाही. यापूर्वी देखील कोंढव्यामध्ये व विशेषतः अशोका म्यूज सोसायटीमध्ये छापेमारी झालेली आहे. यापूर्वी कोंडव्यातून दहशतवादी संघटनांची संबंधित तरुणांना अटक करण्यात आली होती. ही अशोका म्यूज सोसायटी जर्मन बेकरी बॉम्बस्फोट वेळी व इंडियन मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेच्या कंट्रोल रूमच्या छापेमारी वेळी देखील चर्चेत होती. तेव्हा देखील कोंढव्यावर तपास यंत्रणेची नजर होती.
आता कारवाई वर एटीएस कडून अधिकृत माहिती काय येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.