आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्या

BEED NEWS: शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या गुंडाचा आणखी एक कारनामा; अपहरण करून शेतकऱ्याला मारहाण

BEED NEWS: बीडमध्ये (BEED NEWS) गुन्हेगारांच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे.. घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवला.. असं विचारल्याने रागातून आरोपींनी एका शेतकऱ्याला टेकडीवर नेवून बेल्टने आणि बुक्क्यांनी मारहाण केली..

TOP NEWS MARATHI | Yavatmal News : मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला विद्यार्थ्यांच्या मदतीनं विष देऊन संपवलं
बीडमध्ये (BEED NEWS) गुन्हेगारीच्या मालिकांचे सत्र सुरूच असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारांची एकापाठोपाठ एक प्रकरण आता समोर येतं आहेत. परळी तालुक्यामधील नंदागोळ येथील 32 वर्षीय शेतकरी योगीराज अशोक गीते यांच्या घरासमोरून आरोपी सचिन मुंडे आणि आदित्य गीते ये जा करतांना हॉर्न वाजवत होते.. त्यानंतर एके दिवशी शेतकरी योगीराज यांनी आरोपींची गाडी थांबून तुम्ही असं का करतात असं म्हटल्यावर, आरोपींनी तुझ्या बापाचा रस्ता आहे काय?

आम्ही काहीही करू? तू आमच्या नादी लागू नको… नाहीतर तुझ्याकडे बघावं लागेल.. अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले. त्यानंतर 25 जुलै 2024 ला सायंकाळी 5 वाजता योगीराज हे घरी जाताना नंदागौळ ते घाटनांदुर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आल्यावर आदित्य गीते व सचिन विष्णू मुंडे हे दुचाकीवरून आले. त्यानंतर योगीराज यांची कॉलर पकडून त्यांना दुचाकीवर बसवून विठ्ठल टेकडी येथे नेले. तेथे सुमीत हा होता.

शिवसेनेनं धंगेकरांसाठी निर्माण केलं नवं पद; रवींद्र धंगेकरांची महानगर प्रमुख पदी नियुक्ती

तेव्हा सचिन मुंडे व आदित्य गित्ते यांनी ‘तू लई माजलास का? आम्हाला रस्त्यात थांबऊन दुचाकी रेस का करतो म्हणून विचारतो का? असे म्हणून दोघांनी शिवीगाळ करुन सचिन मुंडेने बेल्टने तोंडावर, पाठीवर, पायावर आणि हातावर मारहाण करून जखमी केले. पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून योगिराज यांना तेथेच सोडून ते निघून गेले. योगीराज यांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आरोपींनी शूट करून व्हायरल केला. त्यावेळी आरोपींच्या विरोधात तक्रार केली तर ते पुन्हा मारतील या भीतीने योगीराज यांनी तक्रार दाखल केली नाही.
आता नऊ महिन्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिन मुंडे, आदित्य गित्ते, सुमित उर्फ बबलू बालाजी गित्ते या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य गित्ते याच्यावर दोन दिवसांपूर्वीच शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यात तो अटकही आहे.