Crime

तुझा जीवच घेतो’ म्हणत महिला पोलिसाचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

396 0

पुण्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असताना आता महिला पोलीस आपल्या घरात देखील सुरक्षित नाहीत, असे वाटण्यासारखीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून महिला पोलीस कर्मचाऱ्याचा त्यांच्याच पतीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

हर्षद विकास पानसरे (वय ३६, रा. पोलीस लाईन, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटे विश्रांतवाडी येथील पानसरे यांच्या घरातच घडली. फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी आणि त्यांचे पती हर्षद यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. ते विश्रांतवाडी परिसरात असलेल्या पोलीस लाईन मध्ये राहतात. तर हर्षद हे एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. सदर आरोपी पती नेहमीच चारित्र्यावर संशय घेत पत्नीला शिवीगाळ करत होता. त्याचबरोबर अनेक वेळा अपमान जनक मेसेज देखील पाठवत होता. ज्यावरून वारंवार या दोघांचे वाद होत होते. घटना घडलेल्या दिवशी आरोपीने पत्नी बरोबर अशाच प्रकारे वाद घातले आणि गादीवरून त्यांना खाली ढकलून दिले. त्यावर ‘मी तुझा जीवच घेतो’, असे म्हणत पत्नीचा गळा आवळला. पीडित महिलेने आरडाओरडा सुरू केल्याने आरोपीने एका हाताने कडा आवरून दुसऱ्या हाताने त्यांचे तोंड दाबले. मात्र पीडित महिलेने जोरदार प्रतिकार करत पतीला ढकलून दिले व आपली सुटका करून घेतली. तात्काळ पीडितेने पोलिसांशी संपर्क साधा व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी हर्षद पानसरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide