Amazon delivery fraud Diwali: दिवाळीचा सण जवळ येत असताना संपूर्ण देशभरात खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाजारपेठा आणि ऑनलाईन शॉपिंग साइट्सवर आकर्षक ऑफर्स आणि सवलतींचा (Amazon delivery fraud Diwali) वर्षाव सुरू आहे. पण या खरेदीच्या धडाक्यात हिंगोली जिल्ह्यातील एका ग्राहकाला ऑनलाईन फसवणुकीचा मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Pune road digging regulation: अनियंत्रित खोदकामाला लगाम; आता प्रत्येक केबल मार्किंगनंतरच रस्ते खोदाई
कळमनुरी शहरातील रहिवासी राजू कांबळे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमेझॉन या आघाडीच्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून एअर कंडिशनर (AC) ची खरेदी केली होती. त्यांनी एसीसाठी पूर्ण रक्कम (Amazon delivery fraud Diwali) ऑनलाईन पद्धतीने भरली. काही दिवसांनी कुरिअर बॉय त्यांच्या घरासमोर पार्सल घेऊन आला. पार्सलच्या डब्यावर एसीचा उल्लेख होता, मात्र जेव्हा राजू कांबळे यांनी तो डबा उघडला, तेव्हा त्यांच्या आशेवर अक्षरश: पाणी फिरलं.
HINGOLI AMAZON ONLINE FRAUD NEWS:“ऑनलाईन खरेदीत सावध रहा — पार्सलमध्ये काय येईल, सांगता येत नाही!”
डब्यामध्ये एसीऐवजी लाकडाचे तुकडे, पुठ्ठा आणि टाकाऊ कचरा भरलेला होता. हा धक्कादायक प्रकार पाहून कांबळे स्तब्ध झाले. इतकी मोठी खरेदी करून देखील वस्तू न मिळणं, ही फसवणूक मानली जात असून (Amazon delivery fraud Diwali) त्यांनी अमेझॉन ग्राहक सेवा केंद्राशी तक्रार नोंदवली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. दिवाळीसारख्या महत्वाच्या सणाच्या काळात ग्राहकांची फसवणूक होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पोलिसांकडे देखील तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
Jitendra Awhad acquitted: जितेंद्र आव्हाड फर्ग्युसन कॉलेज प्रकरणामधून निर्दोष मुक्त
तज्ज्ञ सांगतात की, ऑनलाईन खरेदी करताना विक्रेत्याची विश्वसनीयता, रेटिंग आणि रिव्ह्यू तपासूनच खरेदी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगबाबत अविश्वास वाढत असून, अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.