ALANDI NEWS : लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला धुळे येथून जेरबंद करण्यात आलंय. शेवगाव पोलिसांनी धुळ्यापर्यंत पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळाल्या (ALANDI NEWS) काय आहे ही संपूर्ण घटना पाहूयात..
2 जुलै रोजी लग्नाचं आमिष दाखवून मुलीला पकडून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपीला आता मोठ्या शिताफिने शेवगाव पोलिसांनी धुळ्यातून जेरबंद केलंय.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 2 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे यांने त्याचे (ALANDI NEWS) नातेवाईक प्रवीण प्रल्हाद आंधळे, जनाबाई प्रल्हाद आंधळे यांच्यासोबत मिळून पीडित मुलीला बळजबरीने गाडीत बसवून नेले. एवढेच नाही जर तू आरडाओरडा केलास तर तुझ्या अंगावर ऍसिड टाकू अशी धमकीही पीडीतेला दिली. त्यानंतर या मुलीला आळंदी येथे आणण्यात आलं तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि आरोपी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे याने पीडितेसोबत बळजबरीने अत्याचार केला. अशी माहिती पीडितेने फिर्यादीत दिली आहे. 8 जुलैला दिलेल्या फिर्यादीनुसार आंधळे वर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आंधळे फरार झाला. त्याला शोधण्यासाठी दोन पोलीस पथकं तैनात करण्यात आली होती. पुणे, अहिल्यानगर, जालना, संभाजीनगर अशी सतत ठिकाणं तो बदलत होता. आंधळे मध्य प्रदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना धुळे येथे सापळा लावून त्याला पकडण्यात आलं. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि त्यांच्या टीम कडून करण्यात आली.
मागच्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत या प्रकरणात तरी आरोपीला पकडण्यात आले असून त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.