Breaking News

AKSHAY SHINDE ENCOUNTER तळोजा जेल ते मुंब्रा बायपास; पाहा पोलीस व्हॅनमधला संपूर्ण घटनाक्रम

212 0

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ला तळोजा मधून ठाण्याला घेऊन जाताना त्याचा एन्काऊंटर झाला. तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास हा अवघ्या 45 मिनिटांचा प्रवास.. पण याच प्रवासात सगळी चक्र फिरली.. याच 45 मिनिटांनंतर अक्षय शिंदे च्या एन्काऊंटर ची बातमी आली. या 45 मिनिटांच्या प्रवासात पोलीस व्हॅन मध्ये नेमकं काय घडलं ? एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी सांगितला त्या 45 मिनिटांचा संपूर्ण थरार…

आरोपी अक्षय शिंदे चा एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपला जबाब नोंदवला आहे. याच जबाबात त्यांनी तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास या रोडवर पोलीस व्हॅन मध्ये अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये नेमकं काय झालं याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. या घटनाक्रमानुसार, साडेपाच वाजता आरोपी अक्षय शिंदे ला घेऊन पोलिसांचे पथक ठाण्याकडे रवाना झालं. त्यावेळी पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर म्हणजेच पुढे बसले होते. तर आरोपी अक्षय बरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि आणखी दोन अंमलदार हे व्हॅनमध्ये मागे बसले होते.

 

अचानक अक्षय आक्रमक झाला

 

अक्षयला ठाण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या या पोलीस व्हॅनमध्ये आत्तापर्यंत सर्व काही नॉर्मल सुरू होतं. मात्र ही व्हॅन शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या जवळ पोहोचताच मागे बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेंनी संजय शिंदेंना फोन केला. निलेश मोरे यांनी फोनवर अक्षय हा मागे बसलेल्या पोलिसांना ‘तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात मी आता काय केलं’, असे प्रश्न विचारत पोलिसांनाच शिवीगाळ करत असल्याचं सांगितलं. त्यावर संजय शिंदे यांनी व्हॅन थांबवली. ते स्वतः अक्षय बरोबर मागे जाऊन बसले. त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. काही क्षणात, सव्वा सहाच्या सुमारास ही व्हॅन मुंब्रातील मुंब्रा देवीच्या पायथ्याशी पोहोचली अन् अक्षय निलेश मोरे यांच्या कमरेला लावलेलं पिस्तूल रागाच्या भरात खेचू लागला. व्हॅन मधील सगळ्या पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तो मला जाऊ द्या असं जोर जोरात ओरडत होता. या सगळ्या गडबडीत निलेश मोरे यांची सर्व्हिस रिवॉल्वर ट्रिगर्ड झाली आणि मोरेंच्या मांडीत गोळी लागली. त्याचवेळी अक्षयने पिस्तूल काढून हातात घेतली. ‘आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत त्याने संजय शिंदे आणि हरीश तावडे यांच्यावर २ गोळ्या झाडल्या. या दोघांनीही गोळ्या चुकवल्या. अक्षयचा तो संताप आणि आक्रमक रूप पाहून पोलीसही चक्रावले आणि अक्षय ने पोलिसांवर आणखी गोळ्या झाडण्याच्या आधीच संजय शिंदेंनी त्याच्यावर गोळी झाडली. आणि याच गोळीने अक्षयला संपवलं. अक्षय खाली पडला, त्याला तात्काळ जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच अक्षयचा मृत्यू झाला होता.

Share This News
error: Content is protected !!