अकोला : अकोला (Akola Murder) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील बेपत्ता असलेल्या सात वर्षीय शेख अफ्फान या चिमुकल्याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मागच्या 12 दिवसांपासून अफ्फानचा शोध सुरु होता. मृतदेह मिळाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 16 व्या दिवशी आरोपीचा शोध लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा खून दुसरा कोणी केला नसून अफ्फानच्या चुलत भावाने केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांच्या तपासात हा खून असल्याचे समोर आले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील पिंजर गावातून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय अफ्फान या चिमुकल्याचा मृतदेह 11 दिवसांनंतर विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पिंजर येथील शेख अफ्फान आयुब बागवान हा 19 डिसेंबर रोजी बेपत्ता झाला होता. पिंजर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला होता. मात्र तरीही त्याचा शोध लागत नव्हता. 30 डिसेंबर रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पिंजरमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर श्वान पथकाच्या मदतीने एका विहिरीत शेख अफ्फानचा मृतदेह सापडला. अफ्फानचा मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा गळा आवळून खून केल्याचे अहवालातून स्पष्ट झालं.
का केली हत्या?
19 डिसेंबर रोजी मृत शेख अफ्फान आणि त्याचा चुलत भाऊ हे दोघेही एका शेतातील विहिरीच्या बाजूला असलेल्या बंद खोलीतील कबुतर पकडण्यास गेले होते. खोली बंद असल्याने दोघेही खिडकीतू आत शिरले. मृत शेख अफ्फान हा खिडकी जवळ पोते घेऊन थांबला होता. चुलत भावाने अफ्फनला खोलीच्या खिडकीजवळ पोते पकडून बसवले होते. त्यानंतर चुलत भावाने खोलीमधून कबुतर हाकलले. मात्र अफ्फानने जाणूनबुजून कबुतर सोडून दिले असा समज आरोपी भावाला झाला. रागाच्या भरात त्याने अफ्फानचा गळा आवळून त्याला विहिरीत ढकलून दिले. त्यामुळे विहिरीत पडून अफ्फानचा मृत्यु झाला. यानंतर पोलिसांनी आरोपी चुलत भावाला ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा
Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?
Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे
Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं
Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी
Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ
Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर
Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन