आत्महत्येपूर्वी अतुल यांचं मुलासाठी खास गिफ्ट; म्हणाले 'बाळा, हे तुझ्यासाठी...'

ATUL SUBHASH CASE: शेवटी बापच तो! आत्महत्येपूर्वी अतुल यांचं मुलासाठी खास गिफ्ट; म्हणाले ‘बाळा, हे तुझ्यासाठी…’

415 0

बंगळुरुमधील 34 वर्षीय एआय इंजिनिअर (AI Engineer) अतुल सुभाष (Atul Subhash) यांची आत्महत्या आणि आत्महत्येच्या कारणाची देशभरात चर्चा होत आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून अतुल यांनी आत्महत्या केली. मात्र याच अतुल यांनी आत्महत्ये पूर्वी आपल्या लाडक्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवलं आहे.

गिफ्ट काय ?

अतुल सुभाष यांनी सुसाईड नोट लिहीत आपलं जीवन संपवलं. यात सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मुलाबद्दल एक खास गोष्ट लिहून ठेवली आहे. आपल्या चार वर्षांच्या मुलासाठी त्यांनी एक खास गिफ्ट ठेवलं आहे. 2038 मध्ये जेव्हा त्यांचा मुलगा अठरा वर्षांचा होईल, तेव्हा त्यांने हे गिफ्ट उघडावं असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय ?

अतुल सुभाष यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मुलाचा उल्लेख करत लिहिलं आहे की, ‘बाळा, मी तुझा जन्म झाल्यावर तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्यासाठी मला जीव द्यावा लागेल, असा विचार कधीच केला नव्हता. पण, दुर्दैवानं मला तुझ्यासाठी जीव द्यावा लागतोय. तुझा वापर वारंवार मला ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. तुझ्या माध्यमातून माझ्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळले जात आहेत. मी कमावलेल्या पैशांचा वापर मलाच बर्बाद करण्यासाठी केला जात आहे. या सगळ्या सिस्टीमचा मला, माझ्या कुटुंबीयांना त्रास होत आहे. मीच नसेल तर हा पैसाही नसेल. त्यानंतर माझ्या आई- वडिलांना आणि भावाला त्रास देण्याचे काही कारण राहणार नाही.’ असा आशय या सुसाईड नोट मध्ये लिहिण्यात आला आहे.

पत्नीसह वाद का ?

मयत अतुल सुभाष यांचे भाऊ विकास सुभाष यांनी अतुल यांचा आत्महत्येनंतर त्यांना होणाऱ्या त्रासावर भाष्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, अतुल सुभाष यांचे 2019 मध्ये लग्न झालं होतं. काही दिवस सगळं सुरळीत चालल्यानंतर अतुलची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. त्याला अनेक खोट्या आरोपांमध्ये अडकवलं. त्याच्याकडून पैसे उकळले. याच वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अतुल यांनी टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!