PCMC CRIME NEWS: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं.
आता पुण्यातून आणखी एका वैष्णवीचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.
सासरच्या छळाला कंटाळून पिंपरी चिंचवड मधल्या वाकड येथील दिव्यानं आपलं जीवन संपवलय
VIDEO NEWS पुण्यात पुन्हा एका वैष्णवीचा बळी, सासरच्यांवर हात्येचा आरोप
पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या दिव्याला सासरी राहण्यापेक्षा मृत्यूला कवटाळणं जास्त सोपं वाटलं.
दिव्या हर्षल सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या 26 वर्षीय मुलीचं नाव आहे.
वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील W-57 या सोसायटीत राहणाऱ्या दिव्याने 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास राहत्या
घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे. मुलीने घळफास घेतल्याची माहिती समजतात दिव्याचे
माहेरच्या मंडळींनी दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी,
दिव्याची सासरची मंडळी यांच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दिव्याच्या सासरी सातत्याने हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत होता.
दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी, दीर योगेश शांताराम सूर्यवंशी,
सासरा शांताराम उत्तम सूर्यवंशी, सासू कल्पना शांताराम सूर्यवंशी, आणि नणंद जयश्री पवार अशा
सासरच्या कुटुंबियांनी तिचा खून केला असल्याचा दावा
दिव्याच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केलाय.
MUMBAI SCHOOL HOLIDAY: मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
दिव्याच्या मृत्यू प्रकरणी वाकड पोलिसांनी तपास सुरू केला
असून दिव्याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे.
दिव्याच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय. दरम्यान
सोशल मीडियावर सुद्धा या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात असून दिव्याला न्याय मिळण्याची मागणी केली जात आहे.
एकीकडे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण अद्याप निकाली लागलं नाही तोच पुण्यातूनच हुंड्यापायी सासरच्या छळाला कंटाळून
26 वर्षीय दिव्याने जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सासरचा छळाला कंटाळून आणखी किती जणांचे बळी जाणार?
अशा विकृत मानसिकतेचं करायचं काय? असा सवाल उपस्थित होत असून हुंडाबळीच्या घटनांवरून संतापची लाट पसरली आहे.
DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून