Dharashiv News

Dharashiv News : खळबळजनक ! कुत्र्याच्या ‘त्या’ कृतीमुळे उलगडलं बेपत्ता महिलेचं गूढ

543 0

धाराशिव : धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका कुत्र्यामुळे बेपत्ता महिलेचं गूढ उलगडलं आहे. ही घटना तुळजापूरमधील आहे. पाचुंदा तलाव परिसरातून कुत्र्यानं एक कवटी उचलून आणली होती. या कवटीमुळे दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याच उलगडा झाला आहे. घटनास्थळी आढळून आलेल्या वस्तूवरून या महिलेच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली आहे. मात्र पूर्णपणे ओळख पटवण्यासाठी आता पोलिसांकडून डीएनए चाचणी केली जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पाचुंदा तलावाच्या परिसरातून कुत्र्याने एक मानवी कवटी तोंडात धरून आणली या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी साडी मंगळसूत्र आणि काही कपडे आढळून आले. यानंतर पोलिसांनी या वस्तूंच्या आधारे तपास सुरू केला.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरातील रहिवासी असलेल्या अनिता इंगळे या घरातून निघून गेल्याची नोंद तुळाजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या वस्तू या महिलेच्या घरच्यांना दाखवल्या, या वस्तूच्या आधारे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. मात्रतरीदेखील अधिक खात्री करण्यासाठी पोलिसांकडून आता डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. तुळजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!