Advay Hire

Advay Hire : अद्वय हिरे यांचा ‘त्या’ प्रकरणी जमीन अर्ज फेटाळला

685 0

नाशिक : रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अद्वय हिरे यांनी यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर केल्याने हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. अद्वय हिरे यांना जामीन नाकारल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मालेगावच्या रेणुका सुत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांच्या विरोधात रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना भोपाळवरून अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले. अद्वय हिरे यांनी यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी यावेळी केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारून अजून 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

IND vs AUS T20 : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका? महत्वपूर्ण सामन्यापूर्वी निम्मा संघच बदलला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!