ADV.R R KAVEDIYA DOUND CASE: वैष्णवी हगवणे प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नुकतीच आर आर कावेडिया यांची नियुक्त करण्यात आली..
याच आर आर कावेडिया यांची पुण्यातील दौंडमधल्या तिहेरी हत्याकांडाचा खटला लढवला होता ADV.R R KAVEDIYA DOUND CASE:
आणि या तिहेरी हत्याकांडाच्या खटल्यात पोलिस उपनिरीक्षकाला अखेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती…
पाहुयात विशेष सरकारी वकील आर आर कावेडिया यांनी लढवलेला खटला नेमका काय होता?
ADV R.R.KAWEDIYA VAISHNAVI HAGWANE CASE: कस्पटे कुटुंबीयांची मागणी मान्य!;वैष्णवी हगवणे प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. राजेश कावेडिया यांची नियुक्ती
16 जानेवारी 2018 रोजी दौंड परिसरातील नगरमोरी चौक व जिजामाता नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली.
घटनेच्या दिवशी उसनवारी घेतलेले पैसे परत करण्यावरून गोपाळ शिंदे व पोलिस उप निरीक्षक संजय शिंदे यांमध्ये वाद सुरू होते. याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी गजानन काळुराम शिंदे त्यांच्या मेहुण्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी, गजानन यांनी मध्यस्थीकरीत मी पैसे देतो असे सांगून गोपाळ व परशुराम यांना घरी जाण्यास सांगितले.
यादरम्यान, रस्ता ओलांडून जात असताना गोळीचा आवाज झाला.
वेळी, गजानन यांनी मागे पाहिले असता संजय शिंदे याने गोपाळवर गोळी झाडली.
त्यानंतर, त्याठिकाणी असलेल्या परशुराम यांवरही गोळी झाडून संजयने रिव्हॉल्वहर गाडीच्या डिक्कीत टाकून दौंडच्या दिशेने निघून गेला.
त्यानंतर गोपाळ व परशुराम यांना दवाखान्यात नेले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर, संजय याने फिर्यादी यांच्या ओळखीच्या असलेल्या अनिल जाधव याच्या घरी जात घराबाहेर त्याच्यावरही गोळी झाडत यांचाही खून केला.
या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आरोपी पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे याने पैशाच्या किरकोळ वादातून सरकारी शस्त्रगारातून पिस्तूल व काडतुसे चोरून तिघांची हत्या केली या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून आर आर कपाडिया यांनी 32 साक्षीदार तपासले..
त्यात 4 साक्षीदार, बॅलेस्टिक तज्ज्ञ व डॉक्टरांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने दौंडमध्ये दिवसाढवळ्या तिघांची निर्घृण हत्या केली.