Accident News

Accident News : नियतीने डाव साधला ! बहिणीला सोडून घरी परतताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू

860 0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील जाणवली रतांबी व्हाळ येथे मुबंई गोवा महामार्गावर भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार चाकीने वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. अंजली अमित साळवी (37, रा. शिवाजीनगर कणकवली) असे मृत महिलेचे नाव आहे.

काय घडले नेमके?
अंजली ही कणकवलीहून जाणवली येथे स्कुटीवरून बहिणीला सोडायला आली होती. बहिणीला सोडून माघारी परतत असताना मागून येणाऱ्या कारने तिच्या स्कुटीला धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गुरुवारी सायंकाळी आपल्या बहिणीला जाणवली रतांबी व्हाळ येथे घरी सोडून अंजली साळवी या मिडल कट जवळून कणकवलीच्या दिशेने येत असताना कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत अंजली साळवी याना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला.

अंजली साळवी यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, भाऊ ,बहीण, आई असा परिवार आहे. मयत अंजली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.धडक देऊन पळालेल्या कारचालकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

Shocking Video : केरळमध्ये सुनेनी केली सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र…

IND vs ENG: टीम इंडियाच्या महिलांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी

Pune Accident : धान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात; 2 जण ठार

Allu Arjun : ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने ‘ती’ जाहिरात नाकारत कोट्यवधींच्या ऑफर धुडकावली

Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह

IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!