Accident News

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

464 0

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील दिंडोरी या ठिकाणाहून एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 21 जण जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींमधील अनेकांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमीवर शाहपुरा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

कसा घडला अपघात?
पिकअप चालकाचं बडझर घाटात नियंत्रण सुटलं. त्यामुळे घाटात पिकअप वाहन पलटी झालं. त्यामुळे 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 21 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल कऱण्यात आलेय. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमानंतर घराकडे परत येत असताना पिकअपचा अपघात झाला. घाटामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातामधील जखमीवर शाहपुरा सार्वजनिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. यानंतर स्थानिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केलाय. त्याशिवाय तात्काळ मदत जाहीर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News
error: Content is protected !!