Accident

Accident : लग्नासाठी मुलगी बघायला निघालेल्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

478 0

वाराणसी : कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात एवढा भयंकर होता कि यामध्ये कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात जागीच 6 जणांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर या ठिकाणी भंयकर अपघात झाला.

काय घडले नेमके?
अपघातग्रस्त कार आजमगढहून जौनपूरला निघाली होती. तर ट्रक जौनपूरहून केराकतकडे निघाला होता. दोन्हींची धडक होऊन हा अपघात झाला.कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात कुटुंबातील 6 जण ठार झाले. यात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. जखमींना उपचारासाठी जौनपूहून वाराणसीला पाठवण्यात आले आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला तर ट्रक रस्त्याकडेला पलटी झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. इतर 6 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिघांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले. अनिश गजाधर शर्मा, गजाधर लक्ष्मण शर्मा, जवाहर रामप्रताप शर्मा, गौतम जवाहर शर्मा, सोनम बजरंग शर्मा, रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sophia Leone Death : अ‍ॅडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे निधन

Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!