Bribe News

Bribe News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; ‘एवढ्या’ रुपयांची स्वीकारली लाच

547 0

धुळे : विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 50 हजार रूपयांच्या लाचेची (Bribe News) मागणी करणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांच्या चुलत भावाचा दि.22 ऑगस्ट 2021 रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या हयातीत एच.डी.एफ. सी. कारगो या इन्शुरन्स कंपनीकडून दोन कोटी रूपयांचा विमा काढला होता. मात्र, त्यांचे मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने सदर पॉलिसीची रक्कम वारसांच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे जमा करून फसवणूक केली. याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यांच्याकडे होता.

तक्रारदार यांची वहिणी यांनी तपासकामी न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावरून न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्याकरीता सहा. पोउनि आरिफ अली सैय्यद याने 50 हजारांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांनी दि. 27 फेब्रुवारी रोजी धुळे एसीबीकडे धाव घेतली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. आरिफ अली सैय्यद याचेशी तडजोड करून 40 हजार रूपये देण्याचे तक्रादाराने ठरवले व लाचेची रक्कम घेण्यासाठी गिंदोडिया चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजुस असलेल्या भाग्यश्री पान कॉर्नर समोर बोलावले.

यादरम्यान एसीबीने त्या ठिकाणी सापळा रचला होता. यानंतर सहाय्यक पोउनि आरिफ अली सैय्यद यास लाचेची 40 हजारांची रक्कम स्वीकरताना धुळे एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. दरम्यान कारवाई करताना एसीबीच्या एका कर्मचाऱ्याला झालेल्या झटापटीत पायाला किरकोळ जखम देखील झाली आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. या सगळ्या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kolhapur News : के आय टी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून मतदार जनजागृती विषयी पथनाट्य सादर

Palghar News : 17 विद्यार्थिनीसाठी पाणी ठरलं विष; ‘ती’ चूक पडली महागात

Yogesh Sawant : योगेश सावंत यांना मुंबईतून अटक

Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी

Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर

Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!