Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या

494 0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं कोण आहेत अभिषेक घोसाळकर? त्यांची राजकीय कारकिर्द काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊया…

अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकरांचा मुलगा आहे. दहिसरमधील तरुण नेतृत्व म्हणून अभिषेक घोसाळकर यांची ओळख होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर घोसाळकर कुटुंबांने उद्धव ठाकरेंना साथ दिली. अभिषेक घोसाळकर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. अभिषेक घोसाळकर हे मुंबईतल्या दहीसरच्या कांदरपाडा प्रभागाचे नगरसेवक होते.

घोसाळकर हे दोन वेळा नगरसेवक होते. ते मुंबई बँकेचे संचालकदेखील होते. सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका आहेत. बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा राजकीय दबदबा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते रिक्युअर बोर्डाचे सदस्य देखील होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

Nanded Accident : वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This News
error: Content is protected !!