Crime

पुण्यात भर रस्त्यात तरुणावर कोयत्याने हल्ला; पाहा, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ

518 0

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून सर्वसामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणारे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज रोज व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत दोन व्यक्ती एकमेकांना मारत असून यातील एकाने दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. यात ते दोघेही जखमी झाले आहेत.

ही घटना पुण्यातील चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. किशोर धोत्रे आणि शंकर मिरेकर अशी या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार किशोर धोत्रे आणि शंकर मिरेकर हे नातेवाईक आहेत. धोत्रे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय शंकर मिरेकर याला होता. त्याच रागात मिरेकर याने धोत्रेला भर रस्त्यात गाठून त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या दोघांमध्ये बराच वेळ झटापट झाली. ज्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना घडत असताना रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. तर धोत्रेंनी देखील त्याच्या काही साथीदारांना बोलावून मिरेकर याला मारहाण करायला सांगितले असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. दरम्यान या घटनेवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चतु:र्श्रुंगी पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!