पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असतानाच स्त्रियांवरील अत्याचारांचे गुन्हे देखील वाढत आहेत. पुण्यात स्त्रिया सुरक्षित नाहीत असे वाटण्यासारखा अनेक घटना घडत आहेत. यातच आता रस्त्यावर झोपलेल्या दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग करत अत्याचार करण्याचे प्रयत्न एका तरुणाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेसमोर असलेल्या मेट्रो पुला खाली एक दहा वर्षीय मुलगी आपल्या आईबरोबर झोपली होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास एक तरुण त्या ठिकाणी आला. मुलगी झोपलेली आहे हे पाहून तो देखील मुली शेजारी झोपला व तिचा विनयभंग केला. हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या आईने आजूबाजूच्या लोकांना सांगितले व त्यांनी या तरुणाला पोलिसांचा ताब्यात दिले.
या प्रकरणी अनिलकुमार उपाराम राठोड (वय २०, रा. काळेवाडी फाटा, कैलासनगर, थेरगाव) याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी या नराधमाला तात्काळ अटक केली आहे.