शिक्षणाच्या माहेरघरात चाललंय काय ? शिक्षिकेला दहावीच्या विद्यार्थ्यासह शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडलं

PUNE CRIME : शिक्षणाच्या माहेरघरात चाललंय काय ? शिक्षिकेला दहावीच्या विद्यार्थ्यासह शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडलं

663 0

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांवर, शिक्षकाकडून, कॅब चालकाकडून, इतर स्टाफ कडून लैंगिक अत्याचार होण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. मात्र यावेळी चक्क एका शिक्षिकेने पौगंडावस्थेतील एका विद्यार्थ्याला आपल्या वासनेची शिकार बनवण्याची उत्पादक घटना समोर आली आहे. शाळेतील 27 वर्षीय शिक्षिकेने 17 वर्षांच्या विद्यार्थ्याबरोबर शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध (pune crime) प्रस्थापित केले. नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊया..

चक्रावून टाकणारी ही घटना पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली. या शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याबाबत शाळेतीलच 27 वर्षीय शिक्षिकेला आकर्षण वाटत होतं. शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही आकर्षणाच्या बळी पाडलं. काही दिवसांनी विद्यार्थ्यालाही शिक्षिका आवडू लागली. यातूनच या दोघांमध्ये शारीरिक जवळता वाढली. आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली.

नेमकं प्रकरण काय ?

सध्या या शाळेत दहावीच्या पूर्व परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांसाठी हा विद्यार्थी 27 डिसेंबर रोजी शाळेत आला होता. काही वेळानंतर शाळेतील एक शिक्षक एका खोली समोरून जाताना ही खोली त्यांना बंद दिसली. त्यावेळी परीक्षेच्या काळातही खोली बंद कशी हे पाहण्यासाठी त्यांनी दार उघडलं असता. ही शिक्षिका आणि विद्यार्थी विवस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध ठेवताना आढळले. हे शिक्षकाने लागलीच हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. त्यानंतर शाळेतील सीसीटीव्ही चेक करण्यात आले. त्यामध्ये देखील ही शिक्षिका आणि विद्यार्थी बंद खोलीत जाताना दिसले. याविषयी शिक्षिकेकडे कसून विचारपूस केली असता शिक्षिकेने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली. तर विद्यार्थ्याने देखील ही गोष्ट खरी असल्याचं सांगितलं. एवढेच नाही तर या विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वीच शिक्षिकेला आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे.

त्यानंतर मुख्याध्यापिकेने संस्थाचालकांना याविषयीची माहिती देऊन पोलिसात धाव घेतली. या मुलाच्या पालकांना संबंधित घटनेची कल्पना देऊन खडक पोलीस ठाण्यात (khadak police station) तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा विद्यार्थी एकदा आजारी असल्याने गैरहजर होता. त्यावेळी संबंधित शिक्षिका मुलाच्या घरी गेली होती. त्यावेळी देखील या दोघांनी शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षकी पेशाला काळीमा

गुरु शिष्याचं नातं हे अतिशय पवित्र मानलं जातं. शिक्षक हा नेहमीच आपल्या विद्यार्थ्याला चांगले कर्म करण्याची, चांगली वागणूक ठेवण्याची शिकवण देतात. मात्र याच शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याची घटना पुण्यातील शाळेत घडली आहे. पौगंडावस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य लैंगिक शिक्षण देणं, काय चूक ? काय बरोबर ? हे सांगणं शिक्षकांचं कर्तव्य असतं. मात्र या शिक्षिकेने आपल्या वासनेपोटी अल्पवयीन विद्यार्थ्याला बळीच पाडलं आहे. त्यामुळे शिक्षिकेवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात आरोपी शिक्षकेवर कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!