CHAKAN NEWS: पाठलाग केला, तोंड दाबलं, पडीक ठिकाणी नेलं अन्... पुण्यात महिलेबरोबर नराधमाचं राक्षसी कृत्य

CHAKAN NEWS: पाठलाग केला, तोंड दाबलं, पडीक ठिकाणी नेलं अन्… पुण्यात महिलेबरोबर नराधमाचं राक्षसी कृत्य

665 0

CHAKAN NEWS: महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र होरपळून निघत असताना पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी भयानक घटना पुण्यात घडली.CHAKAN NEWS

नाईट शिफ्ट साठी कामावर निघालेल्या महिलेला जबरदस्तीने ओढून पडीक ठिकाणी नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

MUMBAI KALYAN SCHOOL NEWS : कल्याणमधील नामांकित शाळेत मुख्याध्यापिका, व्यवस्थापकांमध्ये अश्लील चाळेपीडित महिला ही पिंपरी चिंचवडच्या चाकण एमआयडीसी परिसरातील एकाकंपनीत हेल्पर म्हणून काम करते. तेरा मे रोजी तिची नाईट शिफ्ट असल्याने ती अकराच्या सुमारास कंपनीच्या दिशेने जात होती. त्यावेळी या आरोपीने काही वेळ तिचा पाठलाग केला आणि कंपनीच्या अगदी जवळ पोहोचल्यावर मागून महिलेचं तोंड दाबलं, गळा दाबला आणि तिला जबरदस्तीने ओढत रस्त्याच्या बाजूला घेऊन गेला. त्याने या महिलेला जवळच असलेल्या शाळेच्या मागील पडीक ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर तिला जबर मारहाण केली आणि कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर महिलेने त्याचा जमेल तेवढा प्रतिकार करत त्याला जोरदार चावा घेतला. त्यावेळी काही अंतरावर तिला दोन तरुण दिसले. त्यांच्याकडे पाहून तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळेच हा आरोपी घाबरून तिथून पसार झाला.

चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेची मदत केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात पीडीतेने घडलेला सगळा प्रकार सांगून फिर्याद दाखल केली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. त्यामुळेच मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश भांगरे असं या आरोपीचं नाव आहे. तो मेदनकरवाडी या परिसरात वास्तव्यास असून मूळचा अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आहे. तर पोलिसांना या आरोपीला पकडण्यात यश आलंय.

हा नराधम प्रकाश भांगरे हा महिलेच्या कंपनीच्या दिशेने जाताना अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. त्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटवायला फारसा वेळ लागला नाही. पोलिसांनी लगेचच सर्च ऑपरेशन सुरू केलं. दहापेक्षा जास्त टीम आरोपीचा शोध घेत होत्या आणि 24 तासांच्या आत या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. मात्र इतक्या सहजरीत्या हे राक्षसी कृत्य करण्याची त्याची हिंमत झालीच कशी ? त्याने याआधीही असं एखाद्यं कृत्य केलं आहे का ? या सगळ्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे गेल्या काही वर्षात महिला नाईट शिफ्ट मध्ये ही स्वतंत्रपणे काम करत आहेत, धाडसाने स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, अनेक महाविद्यालयीन तरुणही रात्रीच्या वेळी बाहेर फिरत असतात, अशा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

GAJA MARNE MUTTON PARTY: गुंड गजा मारणेची पोलिसांसमोरच मटन पार्टी; VIP TREATMENT दिल्याचं उघड

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी

Share This News
error: Content is protected !!