PUNE NEWS: पुण्यात चाललंय तरी काय ?; महिलेसमोर लघुशंका करणाऱ्याला हटकल्याने पाच जणांकडून पती-पत्नीवर कोयत्याने वार

PUNE CRIME NEWS: पुण्यात चाललंय तरी काय ?; महिलेसमोर लघुशंका करणाऱ्याला हटकल्याने पाच जणांकडून पती-पत्नीवर कोयत्याने वार

683 0

पुण्यात सध्या बेशिस्त, विकृत आणि विक्षिप्त तरुणांनी थैमान घातलंय. ज्यामुळे सर्वसामान्य पुणेकर त्रासले आहेत. एकीकडे शास्त्रीनगरच्या चौकात आलिशान बीएमडब्ल्यू रस्त्यात आडवी लावून भर चौकात अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव अहुजा (Gaurav ahuja) ची सर्वत्र चर्चा झाली. मात्र दुसरीकडे वडगाव (vadgaon, sinhagad road) परिसरात महिलेसमोर लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्यामुळे पाच जणांच्या टोळक्याने महिलेला व तिच्या पतीला धारदार शस्त्रांनी (koyta gang) बेदम मारहाण केल्याच्या घटनेवर तितकसं लक्ष गेलं नाही. मात्र हे प्रकरण गौरव अहुजा प्रकरणापेक्षाही गंभीर आहे.

‘वडगाव आमच्या एन डी भाईचं’

ही घटना पुण्यातील सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरच्या परिसरात घडली. 7 फेब्रुवारीला फिर्यादी महिला व तिच्या पतीसह सिंहगड रोडवरून दुचाकीने कामावरून घरी निघाली होती. त्यावेळी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरच्या बाजूस असलेल्या कट्ट्यावर हे पती-पत्नी गप्पा मारत बसले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी दुचाकी वरून तीन तरुण आले. त्यापैकी एक जण या पती-पत्नीच्या शेजारीच उभा राहून लघु शंका करू लागला. त्यावर या महिलेच्या पतीने त्याला हटकलं. ‘लेडीज च्या समोर लघुशंका का करतोयस’, असं त्यांनी विचारताच हा तरुण चिडला. त्याने या दोघांना शिवीगाळ सुरू केली. त्यावर महिलेने ही ‘तू शिवी का देतोयस’, असं विचारल्यावर या तरुणाच्या मित्रांनी मध्ये येत महिलेच्या पतीला धक्काबुक्की करत मारहाण सुरू केली. त्यातील एकाने कमरेला लावलेला कोयता महिलेच्या पतीच्या हातावर मारला. त्याचबरोबर त्याचा गळा दाबून डोक्यात कोयत्याने वार केले. ‘आम्हाला अडवणारा तू कोण ? वडगाव आमच्या एन डी भाईचं आहे. आम्हाला कोण अडवतंय तेच बघतो. तू आम्हाला अडवतोस का ? आजच तुझी विकेट टाकतो’, अशी थेट धमकीचं या टोळक्याने दिली. तर त्यांनी केलेला कोयत्याचा वार चुकवताना पतीच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली. दरम्यान महिलेने आरडाओरडा केल्याने गर्दी जमली ज्यामुळे हे आरोपी तिथून पळून गेले. तातडीने या दाम्पत्याने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मोहन गोरे, साहिल पठाण, किरण बर्गे अशी या करणातील प्रमुख तीन आरोपींची नाव असून उर्वरित दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. तीनही सज्ञान आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली असून अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!