मैत्रिणीने फेक अकाउंटवरून मैत्रिणीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; बनावट लव्ह स्टोरीने घेतला मैत्रिणीचा जीव

458 0

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर कोरेगाव परिसरात असलेल्या एका गावात राहणाऱ्या तरुणीने मस्करीत इंस्टाग्राम वर मुलाच्या नावाने बनावट अकाउंट बनवून आपल्याच मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ज्यामुळे त्या मैत्रिणीचा जीव गेला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.‌

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव परिसरात अल्ल्याड-पल्ल्याड नावाचे एक गाव आहे. या गावात राहणाऱ्या तरुणीने इन्स्टाग्रामवर वर मनीष पाटील या नावाने बनावट अकाउंट तयार करून आपल्याच एका मैत्रिणीला मेसेज केले. मुलगा असल्याचे भासवत तिच्याशी चॅटिंग केले, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ही लव स्टोरी चालू झाल्यानंतर पीडित मुलगी या बनावट मनीष वर जीवापाड प्रेम करू लागली. एक दिवस तिने मनीष ला भेटण्यासाठी हट्ट धरला. या हट्टामुळे आपला खोटेपणा उघड होईल या भीतीने या तरुणीने आणखी एक अकाउंट बनवले. त्यावरून ‘मी मनीषचा वडील बोलतोय, मनीष आता या जगात नाही, नुकतेच मनीषचे निधन झाले’, असा मेसेज केला.

हा मेसेज पाहून पीडित मुलीला धक्का बसला. ज्या मुलावर आपण प्रेम केले त्याला एकदाही भेटू शकले नाही, याचे तिला प्रचंड दुःख झाले. ती नैराश्यात गेली. आणि नैराश्याच्या भरात मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

मुलीने अचानक आत्महत्या केल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. या आत्महत्येचा पोलिसांकडून तपास सुरू झाला. तपासादरम्यान मयत मुलीचा फोन तपासल्यानंतर मनीष पाटील आणि शिवम पाटील या दोन इंस्टाग्राम अकाउंट वर तिने केलेले चॅटिंग समोर आले. त्यानंतर हे अकाउंट यूजर शोधल्यानंतर अकाउंट बनावट असल्याचे आढळून आले. तर मोबाईल नंबर केल्यानंतर हा नंबर मयत मुलीच्या मैत्रिणीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या मैत्रिणीला अटक केली आहे.

केवळ थट्टा, मस्करीत सुरू केलेल्या या बनावट अकाउंटमुळे एका निष्पाप मुलीचा बळी गेला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Share This News
error: Content is protected !!