VALMIK KARAD: 11 कोटी पोत्यात भरले अन् कराडला दिले; सोलापुरातील शेतकऱ्याचा गौप्यस्फोट

VALMIK KARAD: 11 कोटी पोत्यात भरले अन् कराडला दिले; सोलापुरातील शेतकऱ्याचा गौप्यस्फोट

564 0

दोन कोटींच्या खंडणी प्रकरणांमध्ये तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराड (valmik Karad) याचे नवनवीन पराक्रम समोर येत आहेत. त्यातच आता 140 शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराडने 11 कोटी 20 लाख रुपयाचा गंडा घातल्याचा गौप्यस्फोट पंढरपुरातील एका शेतकऱ्यानं केला आहे. या प्रकरणाने सध्या राज्यभरात खळबळ उडवली आहे.

वाल्मीक कराडने अनुदानाचं अमिष दाखवत सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्याद्वारे ऊस तोडणीचे काम करतात. त्यांनीच आज हा गौप्यस्फोट केला आहे.

तात्कालीन कृषीमंत्री हे माझे जवळचे असून ऊस तोडणी यंत्राला प्रत्येकी 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो, असं अमिष वाल्मीक कराड ने या मशीन मालकांना दिलं होतं.‌ त्या बदल्यात प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचं सांगितलं होतं. यानंतर तब्बल 140 मशीन मालकांनी प्रत्येकी 8 लाख रुपये जमा केले. सर्व रोख रक्कम एका पोत्यात भरून मुंबई येथील विश्रामगृहात कराड यांना पाठवून दिली.

त्यानंतर आपल्याला अनुदान मिळेल या आशेवर मशीन मालक होते. मात्र बराच काळ उलटल्यानंतरही कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यानंतर मालकांनी कराडला फोन करून आम्हाला अनुदान मिळाले नाही आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली. यावेळी कराडने या सगळ्यांना बीडला बोलावून घेतलं. व तिथे पोहोचल्यानंतर माझ्याकडे तुमचे कुठलेही पैसे नाहीत ? असं म्हणत त्यांना मारहाण केली. या सगळ्या प्रकरणा नंतर वाल्मीक कराडच्या भीतीपोटी या मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. मात्र आता समोर येत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

वाल्मीक कराड याचा पाय आणखी खोलात जात असताना दिसत आहे. त्यामुळेच आता त्याच्यावर होत असलेले हे आरोप खरे आहेत का ?, याचा तपास होणार का ? आणि तपासातून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!