PUNE CRIME: पुण्यात अनैतिक संबंधांतून घडला आणखी एक गुन्हा; येरवड्यात तरुणावर कुऱ्हाडीने वार

PUNE CRIME: पुण्यात अनैतिक संबंधांतून घडला आणखी एक गुन्हा; येरवड्यात तरुणावर कुऱ्हाडीने वार

702 0

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने आपला प्रियकर अक्षय जावळकर याला 5 लाखांची सुपारी दिली. त्यानेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली. त्यामुळे अनैतिक संबंधातून घडलेल्या या हत्येची राज्यभरात चर्चा होत असताना पुण्यात पुन्हा एकदा अनैतिक संबंधातून खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील येरवडा (Yerawada) परिसरात घडली असून अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका ठेकेदारावर कुऱ्हाडीने वार (Pune crime) करण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

उमेश वाघमारे असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. रितेश परदेशी असं या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते ते ठेकेदार आहेत. परदेशी हे पुण्याच्या येरवडा परिसरातील जयजवान नगरमध्ये राहतात. वाघमारे यांच्या नात्यातील एका महिलेची परदेशी यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय वाघमारे याला होता. त्याच रागातून सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास परदेशी आपल्या दुचाकीवरून जात असताना आरोपी वाघमारे तिथे आला. त्याने हातात असलेली कुऱ्हाड कपड्यांमध्ये लपवली होती. हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांनी परदेशी यांना थांबवलं आणि अचानक वार करायला सुरुवात केली.

घाबरलेल्या परदेशींनी प्रसंगावधान दाखवत आरोपीचे वार चुकवले. मात्र एक वार हातावर झेलला. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यावेळी घाबरलेल्या आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. तर इतर नागरिकांनी जखमी झालेल्या परदेशी यांना रुग्णालयात नेलं.

दरम्यान सध्या परदेशी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आरोपी उमेश वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत.

रक्षकच बनले भक्षक! ऑन ड्युटी पोलिसाचे 5 वर्षीय चिमुकलीची अश्लील चाळे; नेमकं प्रकरण काय ?

https://www.topnewsmarathi.com/crime/five-year-old-girl-molested-by-on-duty-police-in-pune/

Share This News
error: Content is protected !!