SAMBHAJINAGAR CRIME CASE: शरीरसुख द्यायला नकार देणाऱ्या महिलेला दिल्या मरण यातना

SAMBHAJINAGAR CRIME CASE: मानेवर दोन फुटांचा वार अन् 280 टाके…; शरीरसुख द्यायला नकार देणाऱ्या महिलेला 19 वर्षीय आरोपीने दिल्या मरण यातना

702 0

वाढत्या गुन्हेगारीमुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला हादरवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे 19 वर्षीय तरुणाने एका 36 वर्षीय महिलेच्या संपूर्ण शरीरावर वार (attempt to murder at sambhajinagar) केलेत. यात या महिलेला तब्बल 280 टाके पडलेत. ही महिला सध्या मरण यातना भोगत असून निर्दयी आरोपीला याचा कुठलाच पश्चाताप नाहीये.

नेमकं प्रकरण काय ?

ती घटना आहे छत्रपती संभाजीनगर मधली… या प्रकरणात गंभीर जखमी झालेली 36 वर्षीय महिला की आपल्या शेतात काम करत होती. त्यावेळी तिच्या भावकीतल्या अभिषेक नवपुते या 19 वर्षीय तरुणाचा तिला फोन आला. बाकी काहीही न बोलता त्याने थेट तिच्या कडे शरीर सुखाची मागणी केली. तू तिला म्हणाला की, ‘एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे संबंध जुळवून दे.’ हे ऐकताच घाबरलेल्या महिलेने थेट फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून छोट्याशा पायवाटेने एकटीच घराकडे निघाली होती. त्यावेळी अचानक पाठीमागून आलेल्या आरोपीने तिच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यानं तिची वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं. तोपर्यंत या महिलेला आपल्याबरोबर नेमकं काय झालंय आणि हे कोणी केलं हेही लक्षात आलं नाही. त्यातच तिला काही कळायच्या आतच त्यानं सोबत आणलेल्या कटरनं चेहऱ्यावर वार केला. महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धर पकड केली आरडाओरडा केला मात्र त्यानं थेट तिच्या गळ्यावरच वार केला. महिला जीवाच्या आकांताने ओरडत असताना तिला संपवण्याच्या उद्देशाने या राक्षसाने तिच्या प्रत्येक अवयवावर सपासप वार केले. यातील एक वार तर थेट तिच्या मानेपासून पाठीवर आणि पाठीपासून मांडीपर्यंत केला. हा वार तब्बल सव्वा दोन ते अडीच फुटांचा आहे. या सगळ्यात या महिलेने तिचं स्वतःचं मरण अगदी जवळून पाहिलं. आणि तिला अशाच अर्ध मेल्या अवस्थेत सोडून हा नराधम पसार झाला. पुढे महिलेची सासू शेतातली काम आटवून त्याच मार्गाने घरी जायला निघाली. यावेळी तिने रक्तबंबळ अवस्थेत पडलेल्या सुनेला पाहिलं. त्यानंतर ही घटना संपूर्ण गावाला कळाली. आणि या महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णाला दाखल केल्यानंतर या महिलेवर शस्त्रक्रिया करून वार झालेल्या ठिकाणी टाके घालण्यात आले. पाच-दहा नाही तर तब्बल 280 टाके या महिलेला घातलेत. ही महिला सध्या मरण यातना भोगत असून तिला होणाऱ्या वेदना असह्य आहेत. या यातना मरणापेक्षाही भयंकर असून तिच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाची आपबीती सांगताना महिला म्हणते…’माझ्यावर त्यानं इतके वार केलेत की, डॉक्टरला माझं अंग गोधडी शिवावी तसं शिवावं लागलं. हे वार शिवण्यासाठी हे नुसता दोराच 22 हजार रुपयांचा लागलाय. एकही अवयव असा नाहीये की जिथं त्यानं मला फाडलेलं नाही. या जखमांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठलाय. या यातना, वेदना सहन होत नाहीत अन् रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके मारून शिवलेल्या जखमांवर लागलं की आणखीच आग होते. आता मी करू तरी काय ? जगु तरी कशी ?’

आरोपीला ना दुःख, ना पश्चात्ताप

महिलेला या मरण यातना दिलेला आरोपी अवघ्या 19 वर्षांचा आहे. आणि इतका मोठा गुन्हा केल्यानंतरही त्याला कसलाही पश्चात्ताप होत नाहीये. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी अभिषेक नवपुते हा गावात अगदी ताठ मानेने काहीच न झाल्याच्या आविर्भावात फिरत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतरही त्याच्या चेहऱ्यावर कसलंच दुःख, पश्चात्ताप किंवा चूक केल्याची भावनाही नव्हती. त्यामुळे या आरोपी सारख्या राक्षसांना केवळ तुरुंगात टाकणं पुरेसं आहे का ? इतकी क्रुरता डोक्यात भरलेल्या या विकृत आरोपींना आणि त्यांच्या मानसिकतेला कायमचं ठेचणं गरजेचं आहे.

 

Share This News
error: Content is protected !!