85 Year Old Man Marriage Scam : वृद्धापकाळात प्रत्येकालाच एकाच जोडीदाराची गरज असते. मात्र जोडीदार मिळवण्याचा 85 वर्षीय वृद्धाचा प्रयत्न चांगलाच फसला असून त्याच्याबरोबर अतिशय भयंकर प्रकार घडला. या प्रकरणी पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या वृद्धाबरोबर नेमकं काय घडलं पाहूया (85 Year Old Man Marriage Scam)
पुण्यात राहणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाला लग्न करायचं होतं. त्यासाठी ते वधूचा शोध घेत होते. त्याचवेळी त्यांना वर्तमानपत्रात एक जाहिरात दिसली. ज्यामध्ये एका वधूसाठी वर शोधला जात होता. ही जाहिरात खरी वाटल्याने वृद्धाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर जाहिरात देणाऱ्या व्यक्तीने त्यांना एक बँक खाते क्रमांक दिला. ज्यावर नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. वृद्धाने हे शुल्क भरताच त्यांना लग्नासाठी तयार असलेल्या एका महिलेचा संपर्क देण्यात आला. वृद्धाचं व या महिलेचं फोनवर बोलणं सुरू झालं. ही महिला ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून वृद्धाला तिच्यावर विश्वास बसला. त्यातूनच या महिलेने त्यांच्याकडे (85 Year Old Man Marriage Scam) आर्थिक विवंचनेतून काही पैशांची मागणी केली. 18 एप्रिल ते एक जून या कालावधीत या महिलेच्या सांगण्यावरून विविध बँक अकाउंट मध्ये वृद्धाने 11 लाख 45 हजार 335 रुपये ट्रान्सफर केले. या महिलेने वृद्धाला लग्नाचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळेच त्याने इतकी मोठी रक्कम तिला देऊ केली. मात्र यानंतर जेव्हा या वृद्धाने लग्नाचा विषय काढला तेव्हा महिला टाळाटाळ करू लागली. त्यातूनच आपली फसवणूक झाल्याचं या वृद्धाच्या लक्षात आलं. व त्यांनी थेट बिबवेवाडी पोलीस ठाणं गाठून पोलीस तक्रार दिली.
वृद्धानं दिलेल्या फिर्यादीनुसार, बिबवेवाडी पोलिसांनी शुक्रवारी भारतीय दंड संहितेच्या कलम ३१९ (२), ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल केली. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. तसंच वर्तमानपत्रात येणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.