WARDHA DEVALI NEWS: वर्ध्यातून एक संतापजनक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली.
एका 75 वर्षीय असहाय्य वृद्ध महिलेवर एका नराधमानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना
वर्ध्यातील देवळी तालुक्यात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली…
WARDHA DEVALI NEWS: वर्धा जिल्ह्यातील देवळीत 75 वर्षीय महिलेवर अतिप्रसंग
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात रविवारी एक धक्कादायक घटना घडली..
वर्धातील देवळी तालुक्यातील निपाणी गावात एक 75 वर्षीय वृद्ध महिला भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करते.
ही वृद्ध महिला निपाणी गावात एक झोपडपट्टीत राहते..
त्या ठिकाणी 28 वर्षीय नराधम आरोपी रोशन चिंधू सहारे राहणार मिरापूर हा वृद्ध महिलेच्या झोपडपट्टी जवळ गेला.
आणि घराबाहेर थांबला. त्यावेळी ही वृद्ध महिला झोपडपट्टीत आराम करत होती..
त्यानंतर बराच वेळ घराबाहेर थांबल्यानंतर हा नराधम आरोपी पीडित वृद्ध महिलेच्या घरात शिरला…
आणि पीडित वयोवृद्ध महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. महिलेनं आरडाओरड केली.
मात्र, नराधमानं महिलेला सोडले नाही. त्यानं पीडित महिलेच्या अब्रुचे लचके तोडले.
या घटनेनंतर वृद्ध महिलेनं थेट देवळी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तसेच पोलिसांसमोर आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला..
त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीचा शोध घेत आरोपीला अटक केली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.
75 वर्षीय वृद्ध महिलेवर झालेल्या अत्याचारावरून आता एकचं प्रश्न उभा राहतोय…..
वयाच्या सत्तरीतही महिलां सुरक्षितता नाहीत तर सर्वसामान्य महिलांचं काय होणार? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जातोय.. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जातं आहे.
INDEPENDENCE DAY SPECIAL:कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ
DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून
PUNIT BALAN GROUP DAHIHANDI: पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिहंडी होणार डिजे मुक्त साजरी