Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या
कराड : कराडमधून (Karad News) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये विंग (ता. कराड) या ठिकाणी गावातील मुख्य चाैकात उसाने भरलेला ट्रॅक्टरचा हुक तुटल्यामुळे ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्या उताराने खाली येऊन पाठीमागे उभ्या असलेल्या वाहनांवर आदळल्या. या दुर्घटनेत 7 दुचाकी चिरडल्या गेल्या. तसेच एक छोटा हत्ती, डंपर आणि ट्रकचादेखील भीषण अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1729387445098013104
कसा घडला अपघात?
विंग गावात सोमवारी आठवडा बाजार भरलेला असताना रयत कारखान्याकडे ऊस घेवून निघालेल्या ट्राॅलीची आणि ट्रॅक्टरमधील पीन तुटली. पीन तुटल्याने पाठीमागील दोन्ही ऊसाच्या ट्राॅली उताराला पाठीमागे गेल्या. यावेळी मुख्य चाैका उभ्या असलेल्या सात मोटरसायकल, एक छोटा हत्ती, एक डंपर, ट्रक या वाहणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सुभाष बाबुराव शिंदे हे हे डंपर ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले आहेत.
विंग गावचा आज बाजार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काल रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही
Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल
Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर
